विशाखापट्टणमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 52 वर्षीय व्यक्तीने झोपेत स्वत:चाच खोटा दात गिळला. खोटा दात त्याच्या फुफ्फुसात अडकला.
मिळालेल्या माहितीनुसार ती व्यक्ती स्थानिक कर्मचारी आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बनावट डेंटल सेट वापरत होता. मात्र, बऱ्याच काळानंतर ते सैल झाले होते. अशा स्थितीत झोपेत दातांचा सेट बाहेर आला आणि त्या व्यक्तीने नकळत तो गिळला. त्यामुळे उजव्या फुफ्फुसात दात अडकला. दात अडकल्याने त्या व्यक्तीला सतत खोकला येत होता. त्यामुळे ते डॉक्टरकडे गेले एक्स-रे आणि सीटी स्कॅन केल्यावर फुफ्फुसात दात अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर किम्स आइकॉन हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते दात काढून टाकण्यात आले.