आठवड्याभराच्या तेजीनंतर सोन्याचांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर…

लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीला प्रचंड मागणी असते. मात्र, दिवाळीनंतर सोन्याचांदीच दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खरोदीदारांनी सोने चांदी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता आठवड्याभराच्या तेजीनंतर सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. मौल्यवान धातुच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातु तेजीच्या लाटेवर स्वार झाले. या आठवड्यात सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झाली. मात्र, आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.

सोनेच चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आता लग्नसराईत पुन्हा सोनेचांदीची खरेदी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या आठवड्यात सोने दोन हजारांनी महागले. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. तर 13 डिसेंबर रोजी सोने 600 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,002 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर त्यात 4 हजारांची स्वस्ताई आली. 10 डिसेंबर रोजी 4500 रुपयांनी महागली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. गुरुवारी किंमती हजारांनी वधारल्या. तर 13 डिसेंबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

सध्या 24 कॅरेट सोने 76,922, 23 कॅरेट 76,614, 22 कॅरेट सोने 70,461 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,692 रुपये, 14 कॅरेट सोने 44,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,976 रुपये इतका आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.