यूपीआयने रचला विक्रम; 11 महिन्यांत 15 हजार 547 कोटींचे व्यवहार

जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांनी विक्रम रचला आहे. या कालावधीत यूपीआयद्वारे 15 हजार 547 कोटी व्यवहार झाले, तर 223 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. वित्त मंत्रालयाने शनिवारी एक्सवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यूपीआयवर जगाचा विश्वास वाढत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या यूपीआय सात देशांमध्ये वापरले जात आहे.