मला पदमुक्त करा, नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मोठा निर्णय घेतला. या पराभवाची जबाबदारी पटोले यांनी स्वीकारली असून आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्यात यावे असे पत्र त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले आहे. त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.