हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहातील चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला चार आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजुर केला आहे. तेलंगणा हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेली 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा स्थगित करत अल्लू अर्जुनला जामीन दिला आहे.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी राहत्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्याला तात्काळ नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नामपल्ली न्यायालयाच्या निर्णयाला तेलंगणा हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने सुनावणीनंतर अल्लू अर्जुनला जामीन मंजुर केला आहे.