फोन पे चर्चा… अमित शहांचा शरद पवारांना फोन, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला. शहा यांनी पवार यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज शरद पवार यांना सांयकाळी चारच्या सुमारास फोन केला. शहा यांनी पवार यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रकृतीची चौकशी करून दीर्घायुषी व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

अजित पवार गटाने घेतली भेट
शरद पवार आज दिल्लीत होते. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुबेच्छा दिल्या.