इराणचा हिजाबबाबत नवा कायदा, उल्लंघन केल्यास फाशीची शिक्षा

इराण आपल्या कडक कायद्यांसाठी ओळखला जातो. इराणने नुकतेच हिजाबबाबत नवा कायदा लागू केला जो वादाचे कारण बनला आहे. या कायद्यानुसार, जर महिलांनी हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना फाशीची शिक्षाही होऊ शकते. नवीन कायद्यातील कलम 60 अन्वये दोषी महिलांना दंड, फटके किंवा कठोर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

जर एखाद्या महिलेने एकाहून अधिक वेळा नियंमांचे उल्लंघन केल्यास तिला 15 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. शिवाय इराणी अधिकाऱ्यांनी एक विवादास्पद हिजाब क्लिनीक सुरु करण्याची घोषणा केली ज्याचा उद्देश हिजाबच्या नियमांचे पालन करणे आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, इराणमध्ये कोणत्याही विदेशी मीडिया किंवा संस्थेने हिजाबविरोधी विचारांना प्रोत्साहन दिल्यास त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 12,500 पौंडांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच एखाद्या महिलेच्या अटकेत कोणी अडवण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाही शिक्षा होईल. अशा व्यक्तींना थेट तुरुंगात टाकले जाऊ शकते, असे इराण सरकारने स्पष्ट केले आहे.

इराणमध्ये लागू केलेले नवा कायदा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वादाचा विषय बनला आहे. मानवतावादी संघटनांनी आणि वैश्विक समुदायाने या कायद्याला महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन मानत विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्य़ानुसार, हे पाऊल महिलांचे स्वातंत्र्य आणि अधिकारांवर गदा आहे. तर इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचा उद्देश हिजाब संस्कृचे पावित्र्य राखणे आहे आणि महिलांनी एका विशेष प्रकारच्या ड्रेस कोडसाठी प्रेरित करतो.