लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल नाही

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बद्दल रिल्स व व्हिडीओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन आमदार आदिती तटकरे यांनी केले आहे.