वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 2 हजार रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा, 426 ऑटो जप्त

वाहतूक नियमांना पायदळी तुडवून मनमानी कारभार करणाऱया शहरातील दोन हजार 99 बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाय 426 ऑटो रिक्षा जप्त केल्या.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई करण्याइतके आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कठोर भूमिका घेत परवाना नसणे, वैध फिटनेस प्रमाणपत्र नसणे, क्षमतेहून अधिक प्रवासी भाडे घेणे, शिस्तीचे पालन न करता प्रवाशांना आवाज देऊन बोलावणे, कुठेही व कशाही रिक्षा पार्क करणे असे करणाऱया दोन हजार 99 ऑटो रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. शिवाय 425 रिक्षा जप्त केल्या. 29 नोव्हेंबर पासून आजपर्यंत ही विशेष माहीम राबवत पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांना दणका दिला.