कुर्ल्यात भरधाव बसने सात जणांचा बळी घेतल्याची घटना घडून दोन दिवसही उलटले नसतानाच आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने पुन्हा एका प्रवाशाला चिरडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत 60 वर्षीय पादचाऱयाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीने धडक दिल्यानंतर हा वृद्ध बसखाली आला. दरम्यान, ‘बेस्ट डेपो ते यम सदन’ अशी सुविधा पालिकेने सुरू केली आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
कुर्ला येथे सोमवारी भरधाव बसने 50 जणांना चिरडले. यात 49 जण गंभीर जखमीही झाले. या दुर्घटनेमुळे बेस्ट प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज अवघ्या तिसऱयाच दिवशी बेस्टच्या चाकाखाली येऊन एक 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जीपीओ परिसरातील शिवाला हॉटेलसमोर ही दुर्दैवी घटना घडली. अणुशक्ती नगर ते इलेक्ट्रिकल हाऊस या मार्गावर धावणारी 26 क्रमांकाची बेस्ट बस भाटिया बाग जंक्शन येथे आली असता बसच्या मागच्या चाकाखाली हा वृद्ध सापडला. चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हुसेनर अंदुन्ही असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक ज्ञानदेव जगदाळे यांच्याकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान, दुचाकीस्वार फरार झाला आहे.
गोरेगावात बेस्टने दुचाकींना उडवले
आज सायंकाळी गोरेगाव येथे 447 क्रमांकाच्या बेस्ट बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार दुचाकाRना उडवल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता गाय वासरू चौकात हा प्रकार घडला. यावेळी भरधाव बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार दुचाकींना उडवले. यावेळी सुदैवाने दुचाकीवर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
बेस्ट डबघाईला, 35 लाख प्रवाशांसाठी फक्त तीन हजार गाड्या
- स्टॉपवर प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी
- नवीन गाडय़ा घेण्यासाठी 2800 कोटी मदत देण्यास पालिकेचा नकार