अफगाणिस्तानात आत्मघाती बॉम्बस्फोट; मंत्र्यासह 12 ठार

काबूल येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तालिबान सरकारचे निर्वासित मंत्री खलील हरमान हक्कानी यांच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हक्कानी यांच्या तीन अंगरक्षकांचादेखील समावेश आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मंत्रालयाच्या परिसरात स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारने दिली. स्फोट कुणी घडवून आणला हे अद्याप कळू शकले नाही.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून हक्कांनी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मृत हक्कानी हे तालिबान सरकारमधील मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख चेहरा होता. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी हक्कानी यांच्या हत्येचा निषेध केला. या घटनेसंबंधित अधिक तपशील मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकार काबूलच्या संपर्कात असल्याचे दार यांनी सांगितले.