आधारकार्ड अपडेटसाठी 14 डिसेंबर डेडलाइन

जुने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 ची डेडलाइन आहे. आधारकार्ड या मुदतीत फ्रीमध्ये अपडेट करता येऊ शकणार आहे. यामध्ये ज्या आधारकार्डला 10 वर्षे झाली आहेत. ज्या मुलांना 15 वर्षे झाली आहेत. आधारकार्डमध्ये नाव, फोन नंबर किंवा नावात काही चूक असल्यास आधारकार्ड अपडेट करता येईल. यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. आधारकार्ड अपडेटसाठी अधिकृत केंद्रावर जाऊन अपडेट करावे लागेल. तसेच ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.