परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानाचा आदित्य ठाकरे यांच्याकडून निषेध, शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन

परभणीत काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या संविधानाच्या प्रतीकृतीचा अवमान केला. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निषेध केला आहे. तसेच कायदा सुव्यवस्था पाळून शांतेत आंदोलन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, परभणी येथे एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना अतिशय संतापजनक, निषेधार्ह आहे. ह्या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. संविधानाला श्रेष्ठ मानणाऱ्या सर्वांनीच कायदा सुव्यवस्था पाळून आपले आंदोलन शांततेने करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.