कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या घटनेनंतर 24 तास उलटत नाही तोच मुंबईत पुन्हा एकदा बस अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली येऊन एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका पादचाऱ्याला टू व्हीलरने धडक दिल्याने तो बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली पडून चिरडला गेला. दरम्यान या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 15.25 च्या सुमारास बस अणुशक्ती नगर ते इलेक्ट्रिक हाऊसकडे निघाली होती. 16.25 वाजता बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वालचंद हिराचंद मार्ग आयुक्त कार्यालयाजवळ आली तेव्हा एक पादचारी बसच्या खाली आला आणि हा भीषण अपघात घटनास्थळी घडला आहे.