पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

बंगळुरू येथील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने पत्नीचा जाच आणि न्यायव्यवस्थेला पंटाळून जीवन संपवले. महिलांसाठी बनलेल्या कायद्याचा गैरवापर करून माझी पत्नी निकिता सिंघानिया हिने मानसिक त्रास दिला असा आरोप सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओतून केला आहे. तब्बल 24 पानी सुसाईड नोट लिहून सुभाष यांनी आपली व्यथा मांडली. तसेच मृत्यूपूर्वी दीड तासाचा व्हिडीओ बनवून त्यांनी पत्नीसह तिच्या कुटुंबीयांवर नाना आरोप केले. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील निकिता हिच्याशी अतुल यांचे लग्न झाले होते.