
हिंदुस्थानच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करत असलेल्या बांगलादेशच्या 78 मच्छीमारांसह दोन बांगलादेशी ट्रॉलर्स तटरक्षक दलाने पकडले. आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर गस्तीवर असलेल्या तटरक्षक दलाच्या जहाजाला हिंदुस्थानच्या सागरी क्षेत्रात बांगलादेशचे नोंदणीकृत ट्रॉलर्स निदर्शनास आले. ट्रॉलर्सना समुद्रात पकडून त्यांची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून समुद्रातील अनधिकृत घुसखोरी, बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तटरक्षक दल नेहमी गस्त घालत असते. र्अीगस्टमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर सागरी मार्गाने बेकायदेशीर स्थलांतर होऊ नये म्हणून तटरक्षक पाळत ठेवून आहे.