
तृणमूल काँग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारवर संसदेची हत्या केल्याचा आणि सर्वसामान्यांना प्रभावित करणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचं टाळल्याचा आरोप केला. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार सागरिका घोष यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर उच्च संवैधानिक पदांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तर खासदार साकेत गोखले यांनी दोन्ही सभागृहांमध्ये वारंवार व्यत्यय आणल्याबद्दल सत्ताधारी पक्षाला दोष दिला.
सागरिका घोष म्हणाल्या आहेत की, हे सरकार संसदेची हत्या करत आहे. सर्वसामान्यांवर प्रभावित करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसल्यामुळे ते घबरलेत. भाजप आणि सरकार उच्च संवैधानिक पदांचा गैरवापर करत आहेत आणि त्यांना कार्यकारी अधिकाराच्या अधीन करत आहेत.
घोष म्हणाल्या की, “राज्यसभेत विरोधकांकडे संख्याबळ नसले तरी हा लढा त्या सर्वांविरुद्ध आहे, ज्यांना आपली संसदीय व्यवस्था नष्ट करायची आहे. आपल्या संसदीय लोकशाहीची अखंडता आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीचे घटनात्मक अधिकार धोक्यात आहेत.”