देशातील प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथ पुरी मंदिरात तीन वर्षांत 113.2 कोटी रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती समोर आली. ओडिशा सरकारचे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी विधानसभेत देणगीच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. 2023-24 मध्ये 44.90 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 17.31 कोटी रुपयांची देणगी मिळाली.