बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर चर्चा नाकारली

बांगलादेशातील हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणी आज केंद्रातील भाजप सरकारने फेटाळली. शिवसेनेने याबाबत लोकसभेत तातडीच्या चर्चेची मागणी केली होती. बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून तिथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत. धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याविरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदुस्थानने कडक संदेश दिला पाहिजे व ठोस पावले टाकली पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच अनुषंगाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी तातडीने चर्चेची मागणी करत स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, हा स्थगन प्रस्ताव फेटाळून सरकारने चर्चेपासून पळ काढला.