
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नितीन देशमुख, सुधीर सूर्यवंशी, विश्वास थळे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
संपर्कप्रमुख, विधानसभा प्रमुख जाहीर
शिवसेनेच्या भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुखपदी साईनाथ तारे यांची तर पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्कप्रमुखपदी प्रसाद भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुखपदी महादेव घाटाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.