पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एलआयसीच्या बिमा सखी योजनानिमित्त हरयाणात असणार आहेत. ही योजना त्यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हरयाणात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अलीकडेच मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. 18 ते 70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हरयाणात भाजपाप्रणीत सरकार स्थापन झाल्यापासून मोदींचा हरयाणातील हा दुसरा दौरा आहे.