‘कबड्डीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर ‘कामगार महर्षी’ गं. द. आंबेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कबड्डीची चढाई रंगणार आहे. यात व्यावसायिक पुरुष ‘अ’ गट, स्थानिक पुरुष ‘अ’ गट आणि महिला गट एकमेकांशी भिडतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संगीता अहिर यांच्या हस्ते पार पडेल.
आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धा
पुरुष व्यावसायिक संघ ः रिझर्व्ह बँक, भारत पेट्रोलियम, सीबीसी बोर्ड, रुबी कन्स्ट्रक्शन, मध्य रेल्वे, मुंबई अग्निशमन दल, मुंबई कस्टम.
स्थानिक पुरुष (अ) गट ः शिवशक्ती, विजय बजरंग, गोल्फादेवी, बंडय़ा मारुती, जयभारत, शिवमुद्रा, श्रीराम, पिंपळेश्वर, एसएसजी, विजय नवनाथ. स्थानिक महिला गट ः शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, विश्वशांती, जिजामाता, गोल्फादेवी, स्वामी समर्थ, अमर हिंद, चंद्रोदय.