माटुंगा जिमखानाविरुद्ध एका धावेने विजय मिळवत घाटकोपर जॉली जिमखान्याने (जीजेजी) एमसीए प्रेसिडेंट चषक सी अॅण्ड डी डिव्हिजनचे विजेतेपद पटकावले. वेदांश पटेलची (नाबाद 33 धावा आणि 2 विकेट) सर्वेत्तम अष्टपैलू कामगिरी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात घाटकोपर जॉली जिमखान्याने 20 षटकांत 5 बाद 132 धावा केल्या. वेदांशसह तिसऱया क्रमांकावरील प्रतीक म्हात्रे (36 धावा) आणि डावखुरा जय संगानीचे (नाबाद 24 धावा) त्यात सर्वाधिक योगदान राहिले. माटुंगा जिमखान्याकडून डावखुरा फिरकीपटू योगेश डिचोलकरने 14 धावांत 2 आणि ऑफस्पिनर कुणाल गावंडने 22 धावांत 2 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक (अंतिम फेरी) – सी अॅण्ड डी डिव्हिजनः घाटकोपर जॉली जिमखाना – 20 षटकांत 5 बाद 132(प्रतीक म्हात्रे 36, वेदांश पटेल 33 नाबाद, जय संगानी 24 नाबाद; योगेश डिचोलकर 2/14, कुणाल गावंड 2/22) वि. माटुंगा जिमखाना – 20 षटकांत 6 बाद 131(उत्कर्ष राऊत 31, रोनक शिंदे 30, इहसान अमीन 24 वेदांश पटेल 2/24).
जी अॅण्ड एच डिव्हिजनः डॅशिंग एससी – 17 षटकांत सर्वबाद 87 (क्रिश यादव 4/16, अनिकेत जुवेकर 3/27, अभिषेक पान 2/19) वि. बॉम्बे युनियन एससी – 18.3 षटकांत 5 बाद 90(चिन्मय मोहिते 41; तनिश सावे 2 /27).