
पुण्यातील बावधन परिसरात एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अग्नीशमन दलाने सात नागरिकांना धुरामधून बाहेर काढले असून त्यांना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात पाठवले आहे. अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर यांनी याबाबत माहिती दिली.