
शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ”आधीपासूनच हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेनेचा राहिलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बाजूला झालेली नाही. या उलट हाच आमचा हिंदुत्वाचा मुद्दा इतर लोकांनी चोरला.”
भास्कर जाधव म्हणाले की, ”शिवसेनेच्या हिंदुत्वादाच्या मुद्द्यामुळे समाजवादी पक्ष बाजूला जात असेल तर मी स्पष्ट सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही.”
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे, यासाठी महाविकास आघाडी एकत्र मिळून प्रयत्न करणार. विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आम्ही प्रयत्न करणार असल्याच ते म्हणाले.