महादेव सट्टा अॅपप्रकरणी शेअर ब्रोकरला अटक

महादेव सट्टा अॅपप्रकरणी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने कोलकात्यातून शेअर दलाल गौरव कुमार केडियाला अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांच्या कोठडीसाठी ईडीच्या ताब्यात दिले. आरोपी हा महादेव सट्टा अॅपप्रकरणी तुरुंगात असलेल्या नितीन टिब्रेवालसह इतर ऑनलाईन बेटिंग अॅप्सशी संबंधित लोकांसाठी शेअर्सची खरेदी-विक्री करत असे. यातून मिळणाऱया काळय़ा पैशाला तो शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पांढऱ्या पैशात बदलायचा. दरम्यान, महादेव सट्टा अॅप प्रकरणात ईडीच्या रायपूर झोनल ऑफिसने 387.99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणातील फरार आरोपी हरी शंकर टिब्रेवालशी कंपन्यांनी गुंतवणूक केली होती.