EVM विरोधात लोकांमध्ये असंतोष, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; मारकडवाडीवरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

ईव्हीएम विरोधात लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, हीच आमची मागणी आहे. जर एखाद्या गोष्टीमध्य संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात, त्यावेळी परीक्षा कॅन्सल होते. म्हणून एखादी गोष्टी जर पारदर्शक करता येत असेल आणि जगातही बदल झालेला आहे तर आपणही करावा, एवढीच मागणी आहे. एकदा जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं तर ईव्हीएमचा कुठलाही प्रश्न येत नाहीत. आणि जगात हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय अडचण आहे? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. सरकारने हा प्रयत्न हाणून पाडला. यावरून सुप्रिया सुळे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.

शरद पवारसाहेब आणि जयंत पाटील हे उद्या मारकडवाडीला जाणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. एखादी प्रक्रिया आणि ती प्रक्रिया निवडणूक आयोग थांबवत नाही तर सरकार थांबवतंय. एखाद्या गावाला एखादी अॅक्टिव्हिटी करायची असेल, एखादी ड्रील घ्यायची असेल तर त्याच्यात गुन्हा कसा असेल? आणि तिही संविधानच्या चौकटीतील अॅक्टिव्हिटी आहे ना? असे सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.

आश्चर्य वाटलं. आधी सरकार स्थापनेसाठी भाजप आक्रमक होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास दोन आठवडे झाले, मुख्यमंत्री व्हायला वेळ लागला, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागतोय. एवढं मोठं बहुमत महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे, तर मग लोकांच्या आपेक्षी वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेत एवढा उशीर का होतोय? हे दुर्दैवं आहे. जनतेनं मतं दिली असं ते म्हणताहेत तशी ती दिली असतील तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला स्थिर सरकार का मिळत नाही? हे आश्चर्य आहे, असं का होतंय एवढं बहुमत असताना? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

ईव्हीएम विरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याबाबत सोमवारी आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. पुढच्या पंधरा दिवसांत सगळ्यांशी चर्चा करू आणि मतं जाणून घेऊ. सर्वांचा ईव्हीएमला तीव्र विरोध आहे.