नोवाला मागे टाकत इंग्लंड आणि वेल्समध्ये मुलांना मुहम्मद नाव ठेवण्याचा मोठा ट्रेंड

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या मोहम्मद नावाचा ट्रेंड सुरू आहे. लहान मुलांची नाव ठेवताना मोहम्मद हे सर्वात लोकप्रिय ठरत आहेत. मोहम्मद नावाच्या या ट्रेंडमुळे त्यापूर्वी सर्वात लोकप्रिय असलेले नोवा हे नाव मागे पडले आहे.

मोहम्मद हे नाव 2023 मध्ये इंग्लंड आणि वेल्समधील लहान मुलांसाठी सर्वात लोकप्रिय नाव बनले. यामुळे अनेक वर्षे अव्वल स्थानावर असलेल्या नोवा हे मागे पडले आहे. यूके ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) ने दिलेल्या आकडेवारीवरुन मोहम्मद नावाने 4,600 हून अधिक नोंदणी केली गेली आहे. 2016 पासून मोहम्मद नावाने अव्वल 10 मुलांच्या नावांमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे.

ओएनएसने दिलेल्या अहवालानुसार मुहम्मद आणि मोहम्मद यांसारख्या वेगवेगळ्या स्पेलिंगचा देखील प्रभाव पडला. इंग्लंड आणि वेल्समधील मुलांसाठी शीर्ष 100 बाळांच्या नावांमध्ये ही नावं आहेत.

मुहम्मद हे नाव मुलांसाठी आघाडीवर असताना ऑलिव्हिया हे नाव मुलींसाठी सर्वात लोकप्रिय नाव म्हणून कायम आहे. हे स्थान 2022 पासून कायम आहे. अमेलिया आणि इस्ला अनेक वर्षांपासून त्याच स्थानावर असून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मुलींच्या नावांच्या टॉप 100 यादीत पहिल्यांदाच नवीन नावे आली आहेत. यामध्ये लिलाह, राया आणि हेझेल यांचा समावेश होता. तर जॅक्स, एन्झो आणि बोधी ही मुलांसाठी नवीन नावं आली आहेत.