शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन टर्मचे आमदार सुनील राऊत यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर ते राजीनामा द्यायला तयार असल्याचे जाहीर केले आहे. ‘बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या व होऊन जाऊ दे दूध का दूध, पाणी का पाणी, असे आव्हान सुनील राऊत यांनी निवडणूक आयागोला दिले आहे. सुनील राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
— SunilRaut (@SunilRaut65) December 7, 2024
”आज जे हरले आहेत किंवा कमी मताने जिंकले आहेत सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. बॅलेट पेपरने निवडणुका घेतल्या तर तुम्हाला खात्रीने सांगतो. महायुतीच्या पन्नास ते साठच्या वर जागा जिंकून येत नाही. ज्या प्रकारे निकाल लागला आहे. आमच्या सगळ्यांचं म्हणने आहे की ईव्हीएम मशीन मॅनेज करून, सेटींग करून मिळवलेला हा विजय आहे. एवढा मोठा महाविकास आघाडीचा पराभव होऊच शकत नाही असे जनतेला देखील वाटते. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या व दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. मी स्वतः माझ्या मतदारसंघात किमान 40 ते 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकायला हवाच होतो. पण मी 16 हजारांच्या मताधिक्याने जिंकलो हा निकाल विक्रोळीतील हजारो मतदारांना सुद्धा मान्य नाही. जर का निवडणुका बॅलेट पेपर वर होणार असतील, तर मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे.