मुंबईतील ‘दर्द से हमदर्द तक’ ट्रस्टतर्फे ‘अधिवक्ता दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूरचे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजपूत यांनी 109 प्रकरणांत आरोपींना जन्मठेप तर दोन प्रकरणांत फाशी सुनावण्याकामी सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी केली. माजी सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अॅड. सुनीता खंडाळे, अॅड. प्रकाश साळसिंगीकर उपस्थित होते. मान्यवरांनी नवोदित वकील, विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच राजपूत यांनी सुधारित कायद्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक साखळकर यांनी तर आभार अॅड. श्रीराम चिंदरकर यांनी मानले.