विधानसभेत लागलेला निकाल मान्य नसल्याने सोलापूरमधील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र प्रशासनाने या ठिकाणी जमावबंदी लागू करत मोठ्या पोलीस फौजफाट्यात हे मतदान रोखले. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक संतप्त सवाल केला आहे. ”चॅनेल पोल घेऊ शकतात मग एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. संसदे बाहेर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
”खरंतर सत्तास्थापनेनंतर लगेचच सरकारने 2100 रुपये करायला हवे होते. मात्र आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे सरकारने 1 जानेवारी पासून 2100 रुपये सुरू करावे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबाबत विचारताच सुप्रिया सुळे यांनी आम्ही सरकारला पूर्ण सहाय्य करू पण एका व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहाय्य करणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ” एका ससक्त लोकशाहीत विरोधक म्हणून आमचीही जबाबदारी आहे. आहोत. देशाच्या हितासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे”असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
”आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही हा निकाल पूर्णपणे मान्य केलेला नाही. अनेकांनी फेर तपासणीसाठी गेले आहे. भोर तालुक्यात संग्राम थोपटेंना एका बूथवर एक मत पडलं आहे जे अशक्य आहे. मारकडवाडीत जे मतदान घेण्याचा प्रयत्न झाला तो पोलिसांनी थांबवला. चॅनेल पोल घेऊ शकतात मग एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार का नाही? तो पोलिसांनी का थांबवला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.