प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाकीर हुसैन यांच्या कॉन्सर्ट रद्द

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऐनवेळी भारत दौरा रद्द केला आहे. झाकीर हुसेन अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात त्यांचा रक्तदाबही वाढला. तिथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सध्या अमेरिकेतील घरी विश्रांती घेत आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली आहे, असे त्यांचे बंधू तौफिक कुरेशी यांनी सांगितले. दरम्यान, डिसेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यात होणाऱ्या त्यांच्या दोन्ही कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्या आहेत.