फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची शिकार ठरली. सायबर ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले आणि नंतर 99 हजार रुपये उकळले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून या भामटय़ाने शिवांकिताला मनी लॉण्डरिंग आणि अपहरणाचे पैसे तिच्या बँक खात्यात येत असल्याचे सांगून धमकी दिली.
व्हिडीओ कॉलवरील व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसल्याचे शिवांकिताने सांगितले. एकामागून एक चार अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढा, अन्यथा तुम्हाला अटक करून तुरुंगात जावे लागेल, असे ते म्हणाले. शिवांकिताने फसवणूक करणाऱ्याने नमूद केलेल्या खात्यावर दोन वेळा ऑनलाइन 99 हजार रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.