नेत्रहिनांच्या जीवनात आशेचा किरण येणार आहे. उत्तर प्रदेशातील एका टेक स्टार्टअपने ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने एक चष्मा बनविला आहे. हा चष्मा दृष्टिहीनांचे जणू नेत्र बनणार आहे. या चष्म्यात जवळच्या मोबाईल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.
हा खास चष्मा बनवणाऱया स्टार्टअपचे नाव कॅडर टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस लिमिटेड असे आहे. 28 वर्षीय मुनीर खान यांनी हे स्टार्टअप सुरू केलंय. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. 16-17 डिसेंबरला आयआयटी मुंबईमध्ये होणाऱया टेकफेस्टमध्ये या चष्याचे अनावरण करण्यात येणार आहे. चष्माच्या प्रोटोटाईपला अमेरिकेच्या ‘एफडीए’ने मंजुरी दिली आहे.