राजकीय नाट्यावर पडदा! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या 11 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू होता. अखेर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कधी आजारी पडणाऱ्या ते अचानक दरे गावी जाणाऱ्या मिंधेंची भाजपने एकप्रकारे जिरवली आहे.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. याआधी त्यांनी 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर 2019 ला त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेला शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले होते. आता फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार असून नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.