निवडणूक आयुक्त नियुक्ती खटल्यातून सरन्यायाधीश खन्ना यांची माघार

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीशी संबंधित खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी माघार घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता नवीन खंडपीठासमोर 6 जानेवारीपासून होणार आहे. 21 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलमधून सरन्यायाधीशांना वगळताना त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नियुक्त करणारे नवीन विधेयक मंजूर केले. त्याला काँग्रेस कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी आव्हान दिले. यानंतरही केंद्राने नवीन आयुक्तांची नियुक्ती केली होती.