बाटलीबंद पाणी आता अतिधोकादायक यादीत, खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय

बाटलीबंद पाणी आता अतिधोकादायक यादीत गणले जाणार आहे. प्रवासादरम्यान किंवा कुठल्याही ठिकाणी खरेदी केलेले बाटलीबंद पाणी हे पिण्यायोग्यच असल्याचे आपण मानतो, परंतु मिनरल वॉटर किंवा पॅकेज्ड ड्रींपिंगच्या नावाखाली शुद्ध पाणी सांगून अनेकदा फसवणूक होते. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन एफएसएसएआय अर्थात भारतीय अ्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने बाटलीबंद पाण्याचे अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत वर्गीकरण केले आहे. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणे अनिवार्य असेल. तसेच या पाण्याचे आणि पाणी विकणाऱया पंपन्यांचे ऑडिटही केले जाणार आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच पॅकेज्ड ड्रींकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी ‘बीआयएस’ अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्सकडून दिले जाणारे प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली आहे. त्यानंतर आता ‘एफएसएसएआय’ने नवीन निर्णय घेतला असून या निर्णयामुळे पॅकेज्ड ड्रींकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर विव्रेत्या कंपन्यांकडून होणाऱया फसवणुकीला चाप बसणार आहे. नव्या नियमांनुसार कंपन्यांना ‘एफएसएसएआय’च्या वार्षिक तपासण्यांना सामोरे जावे लागेल. कोणत्याही कंपनीला परवाना मिळण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यावीच लागेल.

z सर्व पॅकेज्ड ड्रींकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांना अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे. तसेच या उत्पादकांना आता ‘एफएसएसएआय’चे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्याचबरोबर थर्ड पार्टी अन्न सुरक्षा संस्थांकडून वार्षिक ऑडिटही करून घ्यावे लागेल.