बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने सोमवारी केलेल्या पोस्टवरून गोंधळ उडाला आहे. विक्रांतने तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा अशा बातम्या प्रसारित झाल्यानंतर आता स्वतः विक्रांतने पुढे येत या सर्व अफवा आहेत. मी अभिनयातून निवृत्ती घेतली नाही, असे स्पष्ट केले आहे. अवघ्या 24 तासांमध्ये यूटर्न घेत विक्रांत याने आपल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे म्हटले आहे. ना मी निवृत्ती घेतलीय, ना मी इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला फक्त एक ब्रेक हवा आहे, असे विक्रांतने आता म्हटले आहे.
विक्रांतने काही चित्रपट साईन केलेले असून त्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो ब्रेक घेणार आहे, असेही तो आता म्हणतोय. मला थोडी मोठी विश्रांती हवी आहे. मी कुटुंबीयांनासुद्धा मिस करतोय, तब्येतही ठीक नाही. त्यामुळे मी ती पोस्ट केली, परंतु लोकांनी माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला, असे सांगायलाही विक्रांत विसरला नाही. विक्रांत मॅसी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. नमस्कार, मला वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचे आहे. योग्य वेळ येईपर्यंत, येत्या 2025 मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचे भेटूयात, असे पोस्टमध्ये म्हटले होते.