ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षाव्यवस्थेत वाढ, प्रशासन अलर्ट

जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असलेल्या प्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आला आहे. याबाबतचा धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलीस आणि सुरक्षादल घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा धमकीचा मेल कोणी आणि कुठून पाठवला याची तपास आग्रा पोली करत आहेत.

आग्रा येथील पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता. त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही तपास सुरू आहे. ईमेलनुसार अद्याप असे कोणतेही इनपुट मिळालेले नाही. मात्र, सुरक्षेसाठी ताजमहल परिसरात बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी पथक, श्वानपथक आणि इतर पथके तैनात करण्यात आली आहेत.

पर्यटन विभागाने या संशयास्पद ईमेलची माहिती आग्रा पोलिसांना दिली आहे. त्याआधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही ताजमहल, लाला किल्ला यासारख्या वास्तूंसाठी अशा धमक्या आल्या आहेत. समाजात दहशत पसरवण्यासाठी काही समाजकंटक फसव्या धमक्या देत असतात. त्यामुळ ही धमकी कोणी आणि कुठून पाठवली, याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ताजमहलच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून प्रशासन आणि पोलीस सतर्क आहेत.