गेल्या वर्षभरापासून मुंबई लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता हाच मुद्दा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत मांडला. दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनचा मुद्दा उपस्थित करत संसदेत संजय दिना पाटील म्हणाले की, लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या वर्षभरापासून लोकल ट्रेन उशिराने धावत असून अनेक लोकल्स रद्द होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.”
पाटील म्हणाले, ”मागील दोन महिन्यांपासून लोकल ट्रेन उशिराने धावण्याची समस्या अधिक वाढली आहे. यासाठी वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच संबंधित अधिकारी लक्ष घालून कोणतंही परीवर्तन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. यामध्ये जोही अधिकारी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई करा आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवावी.”