हिंदुस्थानचा उल्लेख ‘प्रयोगशाळा’ असा केला; बिल गेट्स यांच्यावर सोशल मिडीयातून टीकेची झोड

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक, अब्जाधीश बिल गेट्स अनेकदा त्यांच्या दानशूरपणाबाबत आणि सामाजिक कार्याबाबत चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत. ते मात्र हिंदुस्थानबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी हिंदुस्थानचा उल्लेख प्रयोगशाळा असा केला. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

बिल गेट्स आणि रीड हॉफमनचा नुकताच प्रसारीत झालेल्या पॉडकास्ट या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या पॉडकास्टमध्ये गेट्स यांनी हिंदुस्थानचा उल्लेख जगाची प्रयोगशाळा असा केल्याने त्यांच्यावर सोशल मिडीयावर टीका होत आहे. त्यांनी हिंदुस्थानला जगाची ‘एक प्रकारची प्रयोगशाळा’ असं म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे ते हिंदुस्थानला कमी लेखत आहेत, असे अनेकांनी म्हटले आहे. बिल गेट्स यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहिम सुरु करण्यात आली आहे. तसेच सोशल मिडीयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे हिंदुस्थानबाबतचे विधान असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. रीड हॉफमनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान बिल गेट्स यांनी हिंदुस्थानात अनेक गोष्टी रुजवण्याबाबत प्रयोग करण्यात येऊ शकतात. त्यामुळे हा देश जगाची एक प्रकारे प्रयोगशाळा आहे, असे म्हटले आहे. हिंदुस्थाना हा एक असा देश आहे जिथे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यासारखी अनेक आव्हाने आहेत. मात्र भारत या आव्हानांना तोंड देत आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. आपल्याला वाटते की 20 वर्षांनी हिंदुस्थान खूप प्रगती करेल. हा देश एक प्रकारची प्रयोगशाळा आहे, जिथे आपण नवीन पद्धती वापरून पाहू शकतो. जर या पद्धती भारतात काम करत असतील तर जगातील इतर देशांमध्येही त्या लागू केल्या जाऊ शकतात, असं वक्तव्य बिल गेट्स यांनी त्या पॉडकास्टमध्ये केले आहे.

आमचे फाउंडेशन अमेरिकेनंतर हिंदुस्थानात सर्वात जास्त काम करते. आमचे बहुतेक नवीन प्रकल्प फक्त हिंदुस्थानाच सुरू होत आहेत. आम्ही भारतात अनेक नवीन पद्धती वापरत आहोत,” असंही बिल गेट्स म्हणाले. आता त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढत तर्कवितर्क करण्यात येत आहे. बिल गेट्स यांनी राजकीय नेत्यांपासून मीडियापर्यंत सर्वांवरच प्रभाव निर्माण केले आहे. त्यांचे कार्यालय कोणत्याही नियम-कायद्यांशिवाय येथे सुरू आहे आणि आमच्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना हिरो बनवले आहे. आम्हाला कधी जाग येईल माहीत नाही, असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.