प्रसिद्ध अभिनेत्रीचा हृदयद्रावक मृ्त्यू, समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेलेल्या चोवीस वर्षीय अभिनेत्रीवर काळाने घाला घातला आहे. या अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू झाला असून तिच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

अपघातापूर्वी अभिनेत्रीने एक व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तो नेमका कधीचा आहे याबाबत सांगता येत नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून तो तिच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडीओत प्रसिद्ध रशियन अभिनेत्री तिची योगा मॅट घेऊन समुद्र किनाऱ्यावर एका खडकावर बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती तिचं रुटीन फॉलो करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिला समुद्राच्या लाटांचा  आवाज ऐकू येत नाही. त्यानंतर एक मोठी लाट येते आणि कामिलाला समुद्रात ओढून घेऊन जाते आणि काही कळायच्या आधीच ती पाण्यात बुडते. अनेक जण तिला वाचविण्याचा प्रयत्न करतात पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतातय.

असं सांगितलं जात आहे की, कामिलाचा मृतदेह ज्या ठिकाणी ती बुडाली होती, तिथून काही अंतर दूर सापडला. पण ज्या व्यक्तीनं कामिलाला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतलेली ती व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, प्रसिद्ध रशियन अभिनेत्री कामिला बेल्यात्सकाया थायलँडला आपल्या बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती.