मारकडवाडी निवडणूक प्रक्रिया : इलेक्शन कमिशन का घाबरले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

विधानसभा निवडणूकीत EVM ने दिलेल्या निकालाविरोधात आवाज उठवत माळशिरसमधील मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र पोलिसांनी मतदानाच्या दिवशी गावात कलम 144 लागू केले. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया गावकऱ्यांना रद्द करावी लागली. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

”निवडणूक आयोग का घाबरले? की या येणाऱ्या सरकारने मारकडवाडीत कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहेत. एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलंल जातंय. चोरलेला निकाल, हिंदुस्थानात कशाप्रकारे लोकशाहीची हत्या होतेय हे जग पाहतंय”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.