पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून बक्कळ कमाई केल्याचा आरोप आहे. याच कारणाने तो मनी लॉण्ड्रींग केसमध्ये अडकला. यामुळे काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घराची आणि विविध कार्यालयाची ईडीने झाडाझडती घेतली होती. मात्र, यावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यावर मौन राखणेच पसंत केले होते. आता शिल्पाने या प्रकरणावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट व्हायरल होत आहे.
शिल्पाने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा व्यायाम करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओला शिल्पाने दिलेली कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमध्ये शिल्पाने आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते, असे लिहीले आहे. शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘स्पाइनल वेव्ह फ्लो हे एक तंत्रज्ञान आहे जे पाठीच्या कण्यातील अडथळे दूर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मज्जासंस्थेमध्ये आराम निर्माण करणे आणि शरीराला तणावमुक्त करण्यास प्रोत्साहित करणे हा त्याचा हेतू आहे. हे एक त्याचे उदाहरण आहे की, जीवनात काहीही शाश्वत नाही.
ईडीच्या छापेमारीनंतर राज कुंद्रा यांच्याकडून एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये त्याने ईडीला सर्वतोपरी मदत करण्याबाबत सांगितले होते. या प्रकरणात आपण लवकरच निर्दोष असल्याचे सिद्ध होईल आणि सत्य कधी ना कधी बाहेर येईल, असे तो म्हणाला होता. राज कुंद्रानेही लोकांना विनंती केली होती की, त्यांनी पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव या प्रकरणात ओढू नये. मात्र, राज कुंद्राच्या बाजूने हे वक्तव्य समोर आल्यानंतरच त्यांना ईडीकडून समन्सही बजावण्यात आले होते. ज्यामध्ये राज यांची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. या आठवड्यात ईडी राज कुंद्राची चौकशी करू शकते.