दिल्लीतून डोंबाऱ्याचा खेळ सुरू; ते डमरू वाजतात हे उड्या मारतात! संजय राऊत यांचा जोरदार टोला

”एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध जे रुसवे फुगवे आहेत त्यामागे दिल्लीतील भाजप अंतर्गत असलेल्या महाशक्तीचा हात आहे. दिल्लीतून डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे, ते डमरू वाजतायत आणि हे इथे आपल्या भागात उड्या मारतायत, असा जोरदार टोला शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील सत्तास्थापनेवर भाष्य केलं.

”एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध जे रुसवे फुगवे आहेत त्यामागे दिल्लीतील एखादी महाशक्ती कार्यक्रम करतेय असं मला वाटतं. त्याशिवाय एकनाथ शिंदे असं धाडस करू शकत नाही. त्यांच्यात तेवढी हिंमतच नाही. जी लोकं अडीच वर्षापूर्वी ईडी सीबीआयला घाबरून शिवसेना फोडून गेले त्यांना तीन वर्षात असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवतायत. दिल्लीच्या सुचनेनुसार डोंबाऱ्यांचे खेळ सुरू आहेत. दिल्लीतून डमरू वाजतोय आणि जो तो आपआपल्या भागात उड्या मारतोय. भाजपमधली महाशक्ती पाठिशी अशल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढा खेळ करू शकत नाी. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही. फडणवीसांना डावलण्यासाठी हे सगळे सुरू आहे. दिल्लीच्या सुचनेनुसार डोंबाऱ्यांचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू वाजतोय आणि हे आपआपल्या भागात उड्या मारतायत. भाजपमधली महाशक्ती पाठिशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढा खेळ करू शकत नाी. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही’, असे संजय राऊत म्हणाले.