कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळीही कंपनीच्या Alto K10 आणि S-Presso च्या विक्रीत घट झाली आहे. काही वर्षांपूर्वी अल्टो ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक होती. आता दर महिन्याला अल्टोसह S-Presso च्या विक्रीतही घसरण होत आहे. या मागचे काय आहे कारण? हेच आपण जाणून घेणार आहोत.
मारुती अल्टो K10 आणि S-Presso च्या विक्रीत पुन्हा घसरण
गेल्या महिन्यात अल्टो आणि एस-प्रेसोच्या 9,750 युनिट्सची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी कंपनीने या दोन कारच्या 9,959 युनिट्सची विक्री केली होती. तसेच एप्रिल-नोव्हेंबर (आर्थिक वर्ष 2024-25) पर्यंत कंपनीने या दोन कारच्या फक्त 82,224 युनिट्सची विक्री केली होती.
विक्री घसरण्याची कारणे
जास्त किंमत: काही वर्षांपूर्वीपर्यंत Alto K10 आणि S-Presso ची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात असायची, मात्र आता तसं नाही आहे. Alto 800 बंद करण्यात आली आहे आणि Alto K10 ची किंमत 3.99 रुपयांपासून सुरू होते. तर S-Presso ची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते.. विक्री घसरण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.
जुनी डिझाइन
Alto K10 आणि S-Presso चे डिझाइन आता खूप जुने झाले आहे. सध्या या दोन्ही कार देशातील सर्वात कॉमन दिसणाऱ्या कार आहेत. यामुळे याला लोकांची कमी पसंती मिळत आहे.