नौदलाची ताकद वाढणार! 96 जहाजांसह पाणबुड्यांचा समावेश होणार

हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी नौदलाच्या ताफ्यात आणखी जहाजे आणि पाणबुडय़ांचा समावेश केला जाणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 26 राफेल मरीनचा करार पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगितले. एक पाणबुडी आणि 62 जहाजांची बांधणी सुरू असून पुढील 10 वर्षांत 96 जहाजे व पाणबुडय़ा नौदलाच्या ताफ्यात असतील. फ्रान्ससोबत नेव्ही प्रकारातील 26 राफेल-एमसाठीचा (मरीन) करार निश्चित होणार आहे. याशिवाय तीन स्कॉर्पिन पाणबुडय़ांच्या करारावर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. येत्या जानेवारीपर्यंत हा करार निश्चित होण्याची शक्यता असल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.