गडकरी म्हणतात, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर

नगरसेवक झाल्यावर त्याचे दुःख आहे की, आमदार झालो नाही. आमदाराला मंत्री न होता आल्याचे दुःख आहे. मंत्री झाल्यावर मनासारखे खाते न मिळाल्याचे दुःख आहे आणि मुख्यमंत्री होता न आल्याचे शल्य त्यांच्या मनात असते. त्यामुळे राजकारण हा असंतुष्ट आत्म्याचा सागर आहे, अशा शब्दांत पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठय़ा झाल्यात. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षश्रेष्ठी केव्हा पदावरून बाजूला करतील याची भीती सतावतेय. यावर आर्ट ऑफ लिव्हिंग हाच उपाय असल्याचे ते म्हणाले.