चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘रॉकस्टार’ फेम अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. नर्गिस फाखरीची बहीण आलियावर तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि महिला मैत्रिणीच्या हत्येचा आरोप असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलिया फाखरी 43 वर्षांची आहे. आलिया फाखरीवर हत्येचा आरोप आहे. आलियाला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या महिला मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली क्वीन्स, न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली आहे. डेली न्यूजनुसार, आलियाने मत्सरातून दोन मजली गॅरेजला आग लावली. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
ज्या गॅरेजमध्ये आलियाने आग लावली, त्या गॅरेजमध्ये 35 वर्षीय एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया स्टार एटीन यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना नर्गिस फाखरीच्या आईने न्यूज आउटलेटला सांगितले की, ”आलियाने असे काही केले असेल, असं मला वाटत नाही.” दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.