सत्ता टिकवण्यासाठी फोन करणाऱ्या फडणवीसांनी मैत्री टिकवण्यासाठी फोन नाही केला अशी टीका माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. तसेच मतपत्रिकेवरच मतदान घेतलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की एका फोनवर बच्चू भाऊ आले, पण फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता. त्यानंतर फडणवीसांनी एकही फोन केला नाही. सत्तेसाठी फोन करणाऱ्या फडणवीसांनी मैत्री टिकवण्यासाठी एकही फोन केला नाही असे कडू म्हणाले.
मतपत्रिकेवर मतदान घेतलं पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच ज्या उमेदवारांसाठी मुख्यमत्र्यांनी सभा घेतली, त्या सभेला चारशे लोकही नव्हते पण आमच्या सभेला 15 हजार लोक होते. प्रत्येकाला वाटत होतं की बच्चू कडू जिंकणार पण माझा पराभव झाला. माझा पराभव झाल्याने अनेकांन प्रश्न पडला. हा चिंतेचा विषय आहे असेही कडू म्हणाले.